Breaking News

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतल्या फलटण तालुक्यातील नेते मंडळींच्या भेटी

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
Meetings of leaders of Phaltan taluka by Chhatrapati Udayan Raje Bhosale

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) ९ नोव्हेंबर - खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काल दि. ८  नोव्हेंबर रोजी फलटण तालुक्यातील नेते मंडळींची भेट घेतली. या दौर्‍याची चर्चा सध्या तालुक्यासह जिल्ह्यामध्ये जोरात सुरू आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या भेटी महत्वपूर्ण ठरणार आहेत.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व दिगंबर आगवणे
     खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली त्यासोबतच महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, प्रल्हादराव साळुंखे-पाटील, आयुर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दिगंबर आगवणे व फलटण तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांची फलटण येथील शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली.

  सातारा जिल्हा बँकेमध्ये  सत्ताधारी गटाच्या विरोधात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जयकुमार गोरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आव्हान निर्माण केलेले आहे. दि. १० रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्या प्राश्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी फलटण तालुक्याचा दौरा केला असल्याचे बोलले जात आहे. 

No comments