आयुर्वेद शिक्षण मंडळाचे संस्थापक वैद्य हरिभाऊ परांजपे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
पुणे, दि. 17 : आयुर्वेद शिक्षण मंडळाचे संस्थापक वैद्य हरिभाऊ परांजपे यांच्या 38 व्या स्मृतीदिनानिमित्त 18 ते 20 नोव्हेंबर 2021 दरम्यान अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, सदाशिव पेठ, पुणे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि वनौषधी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरामध्ये नेत्रतपासणी शस्त्रकर्म सल्ला, मधूमेही नेत्रविकार जनजागृती, रुग्णांना मोफत चष्मे वाटप, कान, नाक व घसा तपासणी, स्त्री विशिष्ट आजार, गर्भसंस्कार समुपदेशन विशेष चिकित्सा, आमवात, संधिवात, डेंग्यु चिकित्सा, मुळव्याध, भगंदर, मुतखडा तपासणी व उपयुक्त चिकित्सा, प्रकृती परिक्षण, रोगनिदान विभागांतर्गत हिमोग्लोबीन तपासणी, आहार सल्ला, योग मार्गदर्शन, सुवर्णप्राशन संस्कार शिबीर, अत्यल्प दरात कोविड प्रतिबंधक औषधे वाटप, औषधी वनस्पती प्रदर्शन, देहदान व अवयवदान नोंदणी अभियान व जागृती करण्यात येणार आहे.
हे शिबीर व वनौषधी प्रदर्शन सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत असून अधिक माहितीसाठी 9022564114 किंवा 9371002478 या क्रमांकावर संपर्क साधावा. शिबीरादरम्यान आयोजित सर्व उपक्रमास अध्यापक, महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचारी आणि सर्व आवासी वैद्य तसेच आंतरवासी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन आयुर्वेद शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनिल बहिरट यांनी केले आहे.
No comments