Breaking News

विधी सेवा व शासकीय योजना महाशिबिराचे आयोजन

Organizing Legal Services and Government Planning Camp

    सातारा    (जिमाका):  पॅन इंडीया अवेरनेस ॲण्ड आउटरीच कॅम्पेन अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा आणि जिल्हा प्रशासन सातारा यांचे संयुक्त विद्यमाने दि.14 नोव्हेंबर 2021 रोजी गजरा मंगल कार्यालय , कोरेगांव येथे विधी सेवा व शासकीय योजना महाशिबिर  आयोजित केलेले आहे. या महाशिबिराचे उध्दाटन न्यायमूर्ती मिलींद जाधव,  उच्च न्यायालय, मुंबई तथा पालक न्यायमूर्ती सातारा जिल्हा यांचे शुभहस्ते सकाळी 10 वाजता. होणार असून मंगला धोटे प्रमुख जिल्हा व सत्र  न्यायधीश तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.

    या महाशिबिरामध्ये महसूल विभाग,पोस्ट खाते, पोलीस विभाग, विधी सेवा प्राधिकरण इत्यादी विविध शासकीय विभागांचे त्यांच्या योजनेची माहिती देण्यासाठी सुमारे 28 स्टॉल  उभारण्यात येणार आहेत. या महाशिबिराचे निमंत्रक श्रीमती तृप्ती  जाधव, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ,सातारा यांनी या महाशिबिरामध्ये नागरिकांनी  उपस्थित राहुन शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

No comments