Breaking News

खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी - पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

Permission to start a private veterinary college in the state

    मुंबई  : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

    मंत्रालयात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत आयोजित बैठकीत श्री. केदार बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. ए. पातूरकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले, राज्यातील पशु वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या मर्यादित असून यामाध्यमातून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थीचीसंख्या कमी आहेत. खाजगी क्षेत्रातील पशु वैद्यकीय पदवीधर उमेदवारांची वाढती मागणी लक्षात घेता खाजगी महाविद्यालय सुरू करण्यासाठी अधिनियमामध्ये सुधारणा करुन खाजगी महाविद्यालये सुरु करण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी सकारात्मक विचार
    महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथील कुशल, अर्धकुशल व अकुशल रोजंदारी/ कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना कृषी विद्यापीठाकडून वर्ग करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे  नियमित करण्याकरिता  सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे श्री केदार यांनी सांगितले.

No comments