फलटण ग्रामीण पोलिसांकडून २४ तासात म्हैस चोर जेरबंद
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ७ नोव्हेंबर - आसू ता. फलटण गावच्या हद्दीत गोठ्यात बांधलेली म्हैस, अज्ञात चोरटयाने चोरून नेली. गुन्हा दाखल होताच, फलटण ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत, २४ तासाच्या आत, म्हैस चोरास अटक करून, त्याच्याकडुन चोरी केलेली म्हैस व गुन्हयाच्या वेळी वापरलेले वाहन असा एकुण ३,९०,०००/- रूपये किमंतीचा मुद्देमाल केला जप्त केला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २९/१०/२०२१ रोजीचे ०६.३० वा. या कालावधीत मौजे आसु, ता. फलटण गावचे हद्दीत मळशी नावाच्या शिवारात, फिर्यादीचे मालकीच्या गोठयात बांधलेली ९०.०००/- रुपये किंमतीची मुऱ्हा जातीची म्हैस कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्या बाबत फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दि ०२/११/२०२१ रोजी देण्यात आली होती.
सदरचा गुन्हा दाखल होताच सातारा चे पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली बरड पोलीस दुरक्षेत्र येथील अक्षय सोनवणे सहा. पोलीस निरीक्षक व पोलीस अमंलदार यांची एक तपास टिम तयार करणेत आलेली होती.
सदर गुन्हयाचा तपास सुरू असताना मौजे आसु ता. फलटण गावातील स्थानिक नागरिकांनी इसम नामे खाजा हाजी शेख रा.आसु ता.फलटण याचेवर संशय व्यक्त केला होता. त्या अनुशंगाने सहा. पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी खाजा शेख याचे बाबत गोपनिय माहिती घेवुन, तपास चालु केल्या नंतर गुन्हा दाखल झाल्या पासुन तो फलटण परिसरात नसलेचे निष्पन्न झाले. त्यामुळे तांत्रिक बांबीचा उपयोग करून त्याच्या मोबाईल वरून, त्याचे लोकेशन प्राप्त करून, सापळा रचुन सदर आरोपी यास त्यांने गुन्हयाचे वेळी वापरलेले वाहन छोटा हत्ती टॅम्पो सह पकडुन, त्यास ताब्यात घेवुन, सदर गुन्हयाचे अनुशंगाने त्याचेकडे चौकशी केली असता, अगोदर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु सी.सी.टी.व्ही फुटेज, मोबाईल लोकेशन तसेच संशयीत छोटा हत्ती वाहन या सर्व पुराव्याचे आधारे कौशल्यपुर्णरित्या तपास करून पुन्हा आरोपीकडे चौकशी केली असता, त्याने सदर गुन्हा केल्या बाबत कबुली दिल्याने त्यास दि.०३/११/२०२१ रोजी अटक करून त्यास मा. न्यायालयात हजर करून त्याची चार दिवस पोलीस कस्टडी घेणेत आली.
आरोपीने ९०.०००/-रू किमंतीची एक म्हैस मुऱ्हा जातीची ६ वर्षे काळ्या रंगाची दोन आकुड गोलाकार शिंगे असलेली म्हैस आरोपीने दलालामार्फत फलटण येथील कत्तलखान्यामध्ये विकल्याची माहिती मिळाल्याने फिर्यादी व स्थानिक आसु गावातील नागरिक यांच्या सहकार्याने चोरीची म्हैस ताब्यात घेण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार टिळेकर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही श्री. धन्यकुमार गोडसे सोो. फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, बरड पोलीस दुरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी श्री. अक्षय सोनवणे, सहा. फौजदार सुर्यवंशी, पो.हवा. टिळेकर, पो.हवा. साबळे, पो.हवा. कर्णे, पो.कॉ.विरकर, पो.कॉ. अवघडे यांनी वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली केलेली आहे. सदर कामगिरी करीता मौजे आसु ता. फलटण गावातील स्थानिक नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
No comments