फलटण तालुका क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे इनडोअर बॅडमिंटन कोर्ट ; खेळाडूंनी लाभ घ्यावा - श्रीमंत संजीवराजे निंबाळकर
बॅडमिंटन कोर्टचे उदघाटन केल्यानंतर बॅडमिंटन खेळताना महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण व प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण तालुका क्रीडा संकुलामध्ये उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्टचा लाभ शहर व तालुक्यातील बॅडमिंटन खेळाडूंनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते या बॅडमिंटन कोर्टचे उदघाटन करण्यात आले. यावेळी तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष आ. दीपक चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, फलटण तालुका क्रीडा संकुल समितीचे कार्याध्यक्ष तथा तहसीलदार समीर यादव, लोणंद नगरपंचायत मुख्याधिकारी हेमंत ढोकले, तालुका क्रीडा संकुल समितीचे सचिव तथा तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे, सचिन धुमाळ, संदीप ढेंबरे, भगत यांची उपस्थिती होती.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा राज्य क्रीडा अधिकारी कार्यालय, साताराच्या माध्यमातून जाधववाडी (फलटण) येथे तालुका क्रीडा संकुल उभारणी सुरू आहे. सद्यस्थितीत तेथे ४०० मीटर धावणे मार्ग प्रशासकीय इमारत व बहुउद्देशीय हॉल उभारण्यात आला आहे.
जाधववाडी ता. फलटण येथे उभारण्यात आलेल्या फलटण तालुका क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्टवर बॅडमिंटनचा सराव दोन सत्रात म्हणजे सकाळी आणि सायंकाळी घेण्यात येणार असून, इच्छुक खेळाडूंनी तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे मो. 9422603411 यांच्याशी संपर्क साधावा.
No comments