श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते 'गंधवार्ता' च्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 7 नोव्हेंबर - महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ‘लक्ष्मी – विलास' या त्यांच्या निवासस्थानी 'गंधवार्ता' ने प्रसिद्ध केलेल्या दिवाळी विशेषांक २०२१ चे प्रकाशन संपन्न झाले.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे, दैनिक गंधवार्ताचे संपादक शामराव अहिवळे, कार्यकारी संपादक रोहित अहिवळे, निंभोरे ग्रामपंचायतचे उपसरपंच मुकुंदराव रणवरे, बापूराव गावडे व गंधवार्ताचे प्रतिनिधी व ऑफिस स्टाफ उपस्थित होता.
यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे यांनी दिवाळी विशेषांकात प्रसिध्द केलेले लेख हे चांगले असून, विशेषतः राजवाड्याचा लेख आवर्जून वाचण्यासारखा असल्याचे सांगून गंधवार्ता दिवाळी विशेषांकाचे कौतुक केले.
No comments