शेखर गोरे म्हणजे माण तालुक्यातील शिल्लक कुष्ठरोग - अॅड. संदीप लोंढे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २४ नोव्हेंबर - श्रीमंत रामराजे यांच्यावरील बेताल वक्तव्या नंतर शेखर गोरे यांच्यावर चारीबाजूने टीका होत आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी चे फलटण शहर प्रवक्ता अॅड. संदीप लोंढे यांनी देखील शेखर गोरे यांना चांगलाच टोला लगावला आहे.
आपली लायकी किती व आपण बोलतो किती हे शेखर गोरे यांनी तपासून पाहावे, त्यांचे वर्तन पाहता ते माण तालुक्यातील शिल्लक कुष्ठरोग असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कुष्ठरोग निर्मूलनासारखे कार्य माण तालुक्यातील जनता येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच करेल, श्रीमंत रामराजे यांच्यावर बोलल्यावर आपली किंमत वाढेल, म्हणून शेखर गोरे हे बेताल वक्तव्य करीत असून, या पुढे देखील वक्तव्य झाल्यास कुणी, कुठे, पाहुणा म्हणून जाऊन, काय कृत्ये केली, आणि सांगली ला काय झाल्यावर कुणाला प्रसाद मिळाला होता, हे सर्व जिल्ह्यातील जनतेला सांगावे लागेल असे प्रसिद्धीपत्रकात अॅड. संदीप लोंढे यांनी म्हटले आहे.
No comments