Breaking News

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून अविनाश चव्हाण यांची निवड

Selection of Avinash Chavan as an invited poet in the 94th Akhil Bhartiy Marathi Sahitya Parishad

    फलटण ( गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १४ नोव्हेंबर -  महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणचे  सदस्य व जाधववाडी ता. फलटण येथील  कवी  अविनाश चव्हाण यांची  ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये निमंत्रित कवींच्या कवी समेंलनासाठी निमंत्रित कवी म्हणून निवड झाली आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

     ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे ३ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर असून स्वागताध्यक्ष छगन भुजबळ आहेत. कवीवर्य श्रीधर नांदेडकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवीसमेंलन होणार असून,  याठिकाणी अविनाश चव्हाण आपली कविता सादर करणार आहेत. याबद्दल मसाप शाखा फलटणच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे सातारा जिल्हा प्रतिनिधी जेष्ठ साहित्यीक व पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनी अविनाश चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या .यावेळी पत्रकार सुभाष भांबुरे, साहित्यिक व महाराष्ट्र साहित्य परिषद फलटणचे कार्यवाह  ताराचंद्र आवळे, लाईफवे फायनान्शियलचे प्रमुख  विशाल कदम उपस्थित होते.

    त्यांच्या या अभिनंदनीय निवडी बद्दल खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर , श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर ,  महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे सातारा जिल्हा प्रतिनिधी जेष्ठ साहित्यीक व पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, फलटण नागरपतिषदेचे विरोधी पक्षनेते  समशेरसिंह नाईक निंबाळकर, सिटीझन जस्टीस प्रेस कोन्सिल ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नागेश भाई सावंत, पत्रकार सुभाष भांबुरे, जेष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र साहित्य परिषद फलटणचे कार्यवाह  ताराचंद्र आवळे, लाईफ वे फायनान्शियलचे प्रमुख  विशाल कदम , नगरसेवक अजय माळवे, सिजेपिसीचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख अँड. शहाजी लोखंडे,  नगरसेवक अनुप शहा, पत्रकार निलेश सोनवलकर, शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख स्वप्नील मुळीक यांच्या सह  विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन केले.

    अविनाश चव्हाण हे युवा कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. आत्तापर्यंत त्यांनी विविध साहित्य व कवी समेंलनामध्ये कविता सादर करून आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. त्याबद्दल त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माणगंगा साहित्य परिषद आयोजित पाडेगाव येथे भरलेल्या पहिल्या' युवा स्पंदन' साहित्य संमेलनाचे ते समेंलन अध्यक्ष होते तसेच विविध कवी संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविलेले आहे.त्यांचा "दोन शब्द" हा कविता संग्रह प्रकाशित असून त्याची प्रस्तावना मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची आहे. त्यांनी विविध व्रुत्तपत्रामध्ये व दिवाळी अंकामध्ये लेख लिहिले आहेत. त्यांच्या कविताही  अनेक कवीसमेंलनामध्ये गाजल्या आहेत. 

No comments