सुयश आवळे याची आखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - आखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आयोजित 94 वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2021 यावर्षी भुजबळ नॉलेज सिटी शैक्षणिक संकुल नाशिक येथे दिनांक 3 ते 5 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनात बाल साहित्य मेळावा आयोजित केला असून, यातील बालकट्टा या बालकवींच्या कविसंमेलनात चैतन्य इंटरनॅशनल स्कूल बारामती येथे शिकत असलेला फलटण येथील बालकवी सुयश ताराचंद्र आवळे याची महाराष्ट्रातून निवडक बाल साहित्यिकांमधून निमंत्रित कवी म्हणून निवड झाली आहे.
बालकट्टा कवी संमेलनात सुयश आवळे हा 'तुम्हीच सांगा महाराज' ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शावर आधारीत व आजची सामाजिक, राजकिय,नैतिक, विचारावर प्रकाशझोत टाकणारी स्वरचित कविता 4 डिसेंबर रोजी सादर करणार आहे. आत्तापर्यंत या कवितेला अनेक बक्षिसे मिळालेली आहेत.सुयश आवळे या बालकवीने आत्तापर्यंत अनेक कवी व साहित्य संमेलनात आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे.तो उत्तम कवी,सुत्रसंचालक,अभ्यासू व गुणी विद्यार्थी असून त्याला कमी वयात सर्वोच्च साहित्य संमेलनात संधी मिळाली आहे. त्याला मार्गदर्शन त्याची आई व कवयित्री सौ.सुरेखा आवळे व वडिल साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी मार्गदर्शन केले. साहित्य संमेलनातील या निवडीबद्दल त्याचे अभिनंदन महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर,सचिन सूर्यवंशी (बेडके),साहित्यिक जगन्नाथ शिंदे,माजी प्राचार्य शांताराम आवटे,कवी अविनाश चव्हाण,प्राचार्य चंद्रकांत ढोबळे, मार्केट कमिटी संचालक योगेश भोसले, डॉ.अजित दडस,सामाजिक कार्यकर्ते अमर गायकवाड सरपंच दिलीप आवळे तसेच साहित्यिक, कला, सामाजिक, शैक्षणिक,राजकिय क्षेत्रांतील मान्यवरांनी केले.
No comments