मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या शेखर गोरेंनी आपली राजकीय उंची तपासून पहावी - विशाल पवार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २४ नोव्हेंबर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, साताराच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत चिट्ठीद्वारे निवडून आलेल्या नवनियुक्त संचालक शेखर गोरे यांनी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांच्याविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा सर्वच स्तरातून तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे.
या पाश्वभूमीवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष श्री. विशाल पवार म्हणाले की, जी व्यक्ती कोणत्याही पक्षाशी एकनिष्ठ राहू शकली नाही, अशा गुन्हेगारी स्वरूपाची पाश्वभूमी असणाऱ्या व्यक्तीने बेताल वक्तव्य करताना आपली राजकीय उंची तपासून पहावी. गेली ३० वर्षे सहकार क्षेत्राचा गाढा अभ्यास असणाऱ्या व सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे भगीरथ समजल्या जाणाऱ्या महाराजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती बँकेची प्रगती दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यामुळेच देशात जिल्हा बँकेचा गौरव अग्रस्थानी आहे. सध्या महाराजसाहेब हे महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे सभापती आहेत व ते जिल्हा बँकेवर बिनविरोधपणे निवडून आलेले आहेत. शेखर गोरेंनी केलेले वक्तव्य म्हणजे राजकीयदृष्ट्या असभ्य, हीन व असंस्कृतपणाचे लक्षण आहे अशा मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या प्रवृत्तीला जिल्ह्यातील जनताच आगामी काळात हद्दपार करेल. त्यामुळे इथून पुढे नशिबाने मिळालेल्या संचालकपदाचा उपयोग त्यांनी शेतकऱ्यांच्या व सभासदांच्या हितासाठी करावा. तसेच राजकारण व समाजकारणात अनेक वर्षे घालवणाऱ्या मोठ्यापदावरील व जेष्ठ व्यक्तिविषयी बोलताना जिभेवर ताबा ठेवावा व वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी. अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल. व या वक्तव्याचा जाहीरपणे मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो.
No comments