Breaking News

श्रीमंत रामराजे, छ. उदयनराजे, छ. शिवेंद्रसिंहराजे सातारा जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोध

Shrimant Ramraje, Chh. Udayanraje, Chh.  Shivendrasinhraje unopposed in Satara District Bank election

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० नोव्हेंबर -  सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुक उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बऱ्याच इच्छुकांनी आपले  उमेदवारी अर्ज मागे घेतले असून, निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले आहे.  आज विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार छ. शिवेंद्रराजे भोसले, शिवरूपराजे खर्डेकर  यांच्यासह  मान्यवर बिनविरोध झाले आहेत. 

    सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकी मध्ये प्राथमिक कृषी पतपुरवठा वि.का.स. सेवा सहकारी संस्था यामध्ये फलटण मतदार संघातून मधून  महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा मतदार संघामधून आ. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, वाई मतदार संघामधून नितीन जाधव पाटील, खंडाळा मतदार संघामधून दत्ता नाना ढमाळ, महाबळेश्वर मतदार संघामधून राजेंद्र राजपुरे तर गृहनिर्माण सहकारी संस्था व दूध उत्पादक संस्था मधून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, कृषी पणन संस्था व प्रक्रिया संस्था ब) कृषी उत्पादन प्रक्रिया सहकारी संस्था  मतदारसंघातून शिवरूपराजे खर्डेकर, कृषी पणन संस्था व प्रक्रिया संस्था अ) खरेदी विक्री संघ मतदारसंघातून आ. मकरंद जाधव पाटील, औद्योगिक विणकर व मजूर सहकारी संस्था मतदार संघामधून अनिल देसाई, एन.टि. प्रवर्गातून कराडचे लहु जाधव, तर अनुसूचित जाती-जमाती मधून सुरेश सावंत हे जिल्हा बँकेवर बिनविरोध निवडून आले आहेत.

  माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आ. जयकुमार गोरे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली असून, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधामध्ये कराड सेवा सोसायटी मतदार संघातून मधून माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर तर पाटण सेवा सोसायटी मतदारसंघातून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात सत्यजित पाटणकर तर जावली मतदारसंघातून आ. शशिकांत शिंदे यांच्या विरोधात ज्ञानदेव रांजणे तर माण सेवा सोसायटी मतदार संघातून शिवसेनेचे शेखर गोरे यांच्या विरोधात मनोज पोळ तर ओबीसी 

    प्रवर्गाततून शेखर गोरे विरुद्ध प्रदीप विधाते तर नागरी नागरी बँका पतपेढ्या यामधून सुनील जाधव विरुद्ध रामराव लेंभे, तर खटाव सेवा सोसायटी मतदारसंघातून प्रभाकर घार्गे विरुद्ध नंदकुमार मोरे अशा लढती रंगणार आहेत.

     महिला मतदार संघातून निवडणूक सुद्धा अटीतटीची रंगणार अशी चिन्ह दिसत आहेत. या मतदारसंघातून माजी आमदार चिमणराव कदम यांच्या सुविद्य पत्नी शारदादेवी कदम, चंद्रभागा शंकर काटकर, ऋतुजा राजेश पाटील, सतीश साळुंके यांच्यामध्ये लढत होणार असून यामधून दोन महिला निवडून येणार आहेत.

No comments