मोफत टॅब व ऑनलाइन प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा - राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे व्यासपीठावर राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे, प्राचार्य बी.एम.गंगावणे सर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ नोव्हेंबर - वर्ग ११ वी सायन्स मधे या वर्षी प्रवेश घेतलेल्या, ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी JEE, NEET, MH-CET चे मोफत ऑनलाईन प्रशिक्षण, याशिवाय मोफत आठ इंची टॅब आणि दररोजचा सहा जीबी इंटरनेट डेटा महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती द्वारा मोफत दिला जाणार असून, विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन, उपलब्ध करून देण्यात आलेल्या संधीचे सोने करावे असे आवाहन राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाज्योती कडून ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅब वितरण व मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या माध्यमातून त्यासंदर्भातील फार्म भरून घेतले जात आहेत. या अनुषंगाने, दि.११ नोव्हेंबर रोजी, मुधोजी हायस्कूल फलटण येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मिलिंद नेवसे बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे, प्राचार्य बी.एम.गंगावणे सर, उपप्राचार्य एम. के.फडतरे उपस्थित होते.
टॅब सोबतच दर दिवशी सहा जीबी इंटरनेट डेटा सुध्दा ऑनलाइन क्लास पहाता यावा, म्हणुन अगदी मोफत देत आहे. ते पुढील शिक्षणासाठीही त्यांना कामी येईल तसेच या JEE, NEET, MH-CET स्पर्धा परीक्षेची सर्व पुस्तकें विद्यार्थ्यांना मोफत घरपोच दिली जातील. विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी महाज्योतीकडे करण्यासाठी १५ नोव्हेंबर २०२९ ही अंतिम तारीख आहे. तरी विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी महाज्योतीच्या या योजनेचा फायदा घ्यावा. ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा मुधोजी हायस्कूल येथे करण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाराष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे व्या सपीठावर राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे प्राचार्य बी.एम.गंगावणे सर |
महाज्योतीच्या वतीने मोफत आनलाईन प्रशिक्षण देण्यात येत असून विद्यार्थ्यांना मोफत टॅब पुरवले जाणार आहेत. ऑनलाईन प्रशिक्षणासाठी अत्यंत तज्ञ प्राध्यापक हे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. मोफत सुविधांचा लाभ घेण्यासाठी या विद्यार्थ्यांना वर्ग १० वी मध्ये शहरी विभाग ७०% व ग्रामीण भाग ६०% मार्क्स असणे आवश्यक, तसेच नॉन क्रिमीलेयर, जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. आनलाईन प्रशिक्षण देत असतांना ग्रामीण व गरीब विद्यार्थ्याजवळ चांगले किंवा मोबाईल नसतात. ही गरज लक्षात घेवुन, विद्यार्थ्यांना अगदी मोफत टॅब देण्यात येणार असल्याचे प्राचार्य बी.एम. गंगावणे सर यांनी सांगून विद्यार्थ्यांनी दिनांक 15 नोव्हेंबर पूर्वी आपले अर्ज मुधोजी हायस्कूल येथून भरून घ्यावेत असे आवाहन केले.
कार्यक्रमास श्री विशाल शिंदे सर , श्री. अभिजित माळवदे सर , श्री. डोंबे सर , श्री नार्वेकर सर , श्री तावरे सर, पत्रकार, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य एम. के.फडतरे यांनी मानले.
No comments