Breaking News

फलटण तालुका हॉटेल असोसिएशनच्या अध्यक्ष पदी तेजसिंह भोसले

Tejsinh Bhosale elected as President of Phaltan Taluka Hotel Association

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  फलटण येथे  फलटण तालुका हॉटेल असोसिएशनची स्थापना करून पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.  याप्रसंगी फलटण शहर व परिसरातील अनेक हॉटेल व्यवसायिक उपस्थित होते. या बैठकीमध्ये फलटण तालुका असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली या निवडीमध्ये असोसिएशनच्या तालुकाध्यक्षपदी तेजसिंह भोसले, उपाध्यक्षपदी महेंद्र सूर्यवंशी - बेडके, सचिव पदी नानासो होले, खजिनदारपदी सन्केत खामकर यांची  निवड करण्यात आली. 

     कोरोनामुळे तसेच सततची होणारी महागाई  यामुळे हॉटेल व्यावसायिक व चालक यांना  अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते, या अनुषंगाने हॉटेल असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे.  बैठकीत  हॉटेल खाद्यपदार्थांचे  दरवाढ करण्याचा तसेच व अमर्यादित थाळी बंद करून मर्यादित थाळी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

     याप्रसंगी या बैठकीसाठी महाराजा मंगल कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल तेजसिंह भोसले यांचा सत्कार उपस्थितांच्या वतीने करण्यात आला. बैठकीचे सूत्रसंचालन व आभार होटेल ब्रह्मा चे मालक अभिजित भोसले यांनी केले. याप्रसंगी  आमिरभाई शेख , प्रभाकर पाटील, वैजनाथ नाळे, महेंद्र इंगळे, करण शिंदे, पोपटराव जगदाळे, अनिल राजे, श्यामराव धुमाळ, प्रभाकर पाटील, प्रवीण नाळे, प्रशांत सरगर आदी फलटण शहर व परिसरातील हॉटेल मालक व चालक बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments