कर्मनिष्ठा सामाजिक संस्थेची आगळीवेगळी दिवाळी
सातारा ( गंधवार्ता वृत्तसेवा) - मातोश्री वृद्धाश्रम, महागाव येथे कर्मनिष्ठा सामाजिक संस्था,सातारा यांच्या वतीने "नवचैतन्याची दिवाळी" या उपक्रमाचे आयोजन ७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते.
नवचैतन्याची दिवाळी या उपक्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन, मातोश्री वृद्धाश्रम येथील आजी आजोबांसाठी केले होते. त्यामध्ये अंध लोकांचा गाण्याचा कार्यक्रम, गाण्याच्या भेंड्या, तसेच त्यांच्यासाठी चित्रकला वर्ग व इतर ऍक्टिव्हिटी घेतल्या, यामध्ये वृद्ध पुरुष महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
याप्रसंगी संस्थेचे सदस्य कै. वैभव सुतार व संस्थेच्या उपाध्यक्षा कै. दिपाली गुडीले यांच्या स्मरणार्थ दैनंदिन वापरातील वस्तूंचे वाटप करण्यात आले व त्यांच्या स्मरणार्थ पेरू व हापूस आंब्याच्या रोपांची लागवड करण्यात आली व त्या रोपांना पेरूला दिपाली व आंब्याला वैभव हे नाव देण्यात आले.
यावेळी संस्थेच्या कामांची माहिती देऊन जुन्या आठवणींना उजाळा देत या नवचैतन्याची दिवाळी कार्यक्रमाच्या मागचा उद्देश संस्थेचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितला.
No comments