Breaking News

श्रीमंत विश्वजितराजे यांनी सभापतीपद स्विकारावे यासाठी दगडूशेठ हलवाईला साकडे

Vishwajit Raje should accept the post of Speaker

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -: फलटण पंचायत समितीचे सभापतीपद श्रीमंत विश्वजितराजे (बाळराजे) यांनी स्वीकारावे याकरिता रूपेश नेरकर (अध्यक्ष) कोळकी  यांनी पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट चे उपाध्यक्ष सुनीलभाऊ रासने यांच्या उपस्थितीत गणपतीला घातले साकडे घातले.

     श्रीमंत विश्वजितराजे यांचे कार्य फलटण तालुक्यातील जनतेला माहीतच आहे, महत्त्वाचे म्हणजे कुटुंब प्रमुख म्हणून फलटण तालुक्यातील जनतेची सेवा करत असताना मागील २ वर्षापासून संपूर्ण जगात कोरोना चे संकट उभे होते. तेव्हा श्रीमंत विश्वजितराजे यांनी कोरोनाच्या सुरुवातीला, फलटण तालुक्यातील जनतेसाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, कोरोना दौरा करून, जनतेला मदत केली व आधार दिला, महाराष्ट्र राज्य नव्हे तर संपूर्ण भारतात कोरोना दौरा करणारे एकमेव नेते म्हणजे श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर (बाळराजे) हे आहेत.  नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या नेत्याने पंचायत समितीचे सभापती पद स्वीकारावे अशी मागणी रूपेश नेरकर यांनी केली.

No comments