युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी डॅशिंग व्यक्तिमत्वाच्या श्रीमंत विश्वजितराजे यांनाच सभापती करा - अॅड. संदिप लोंढे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ : फलटण पंचायत समितीचा सभापती पदाचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे सध्या पंचायत समितीचे सभापती पद हे रिक्त झाले आहे. त्यापदावर श्रीमंत विश्वजितराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचीच नियुक्ती करावी अशी आग्रहाची मागणी श्रीमंत रामराजे यांच्याकडे राष्ट्रवादीचे फलटण शहर प्रवक्ता अॅड. संदीप लोंढे यांनी केली आहे.
श्रीमंत विश्वजितराजे यांच्याकडे असणारा युवकांचा संच पाहता ते पुढील निवडणुकी मध्ये महत्वाची भूमिका नक्कीच बजावतील असे दिसत असून, विकासाची नवी दृष्टी घेऊन, व युवक कल्याण योजना राबीविण्यासाठी विश्वजितराजे हे उत्तम पर्याय असू शकतात.
शेतकऱ्यांच्या प्रति त्यांची असणारी भूमिका ही फलटण तालुक्यामधील शेतकऱ्यांना नक्कीच दिलासादायक ठरेल, तसेच आधुनिक शेती व वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यात त्यांचा नक्कीच हातखंडा आहे. फलटण तालुक्यातील शेतकरी व युवक वर्ग सोशल मीडिया द्वारे जोडण्यात व त्यांच्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी श्रीमंत विश्वजितराजे व त्यांची टीम ही 24 तास कार्यरत असते.
बांधावरील अडचणी बांधावरच किंबहुना "ऑन द स्पॉट" सोडवण्यात विश्वजितराजे माहीर आहेत, श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवराजे व श्रीमंत रघुनाथराजे यांच्या नेतृत्वात काम करून ते अल्पावधीतच युवकांच्या, शेतकऱ्यांचे गळ्यातील ताईत बनले आहेत. गावात तलाठी नाही, ग्रामसेवक नाही, अश्या तक्रारी ची सोडवणूक झटपट होण्याच्या दृष्टीने श्रीमंत विश्वजितराजे यांच्यासारख्या डॅशिंग व्यक्तिमत्वाची गरज आज जाणवत आहे.
श्रीमंत संजीवराजे यांची ही सुरुवात पंचायत समिती सभापती पदावरून झाली होती त्यामुळे विश्वजितराजे यांच्याही राजकारणाची सुरुवात पंचायत समिती सभापती पदावरून करण्यासाठी श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवरजे, व श्रीमंत रघुनाथराजे यांनी श्रीमंत विश्वजितराजे यांनाच सभापती पदी संधी द्यावी अशी मागणी अॅड. संदिप लोंढे यांनी केले आहे.
No comments