विश्वजितराजे यांना पंचायत समिती सभापती पदी संधी द्यावी - विजयकुमार लोखंडे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ नोव्हेंबर - वाठार निंबाळकर गणातील पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांना पंचायत समिती सभापती पदी संधी द्यावी अशी मागणी वाठार निंबाळकर गणातील ढवळ गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार लोखंडे यांनी केली आहे.
फलटण पंचायत समिती सभापती शिवरूपराजे खर्डेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापती पदी, श्रीमंत विश्वजितराजे यांची निवड व्हावी. ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (सभापती विधान परिषद) यांनी, पंचायत समिती फलटण सभापती पदाची माळ पंचायत समिती सदस्य विश्वजीतराजे नाईक निंबाळकर (बाळराजे) यांच्या गळ्यात घालून, वाठार निंबाळकर गणास नेतृत्व करण्याची संधी द्यावी अशी मागणी लोखंडे यांनी केली आहे.
No comments