Breaking News

बुधवारी रक्तदान शिबिर ; नागरिकांनी रक्तदान करावे - जैन सोशल व लायन्स क्लब फलटण

Wednesday blood donation camp; Citizens should donate blood - Jain Social and Lions Club Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १४ नोव्हेंबर -  रक्तदान हे सर्वात श्रेष्ट दान आहे. आपल्या रक्तदानाने एखाद्याचा जीव वाचु शकतो. सध्या फलटण ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा आहे. रक्ताचा तुटवडा कमी करण्याच्या दृष्टीने जैन सोशल ग्रुप, फलटण व लायन्स क्लब, फलटण संयुक्तपणे व फलटण ब्लड बँकेच्या सहकार्याने बुधवार दि. १७/११/२०२१ रोजी  फलटण ब्लड बॅक, फलटण येथे सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.

    तरी फलटण शहर व तालुक्यातील इच्छुक रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे मोठ्या संख्येने रक्तदान करावे  असे आवाहन जैन सोशल ग्रुप, फलटण, लायन्स क्लब, फलटण यांच्याकडून करण्यात आले आहे.

No comments