Breaking News

सोमवार पेठ, फलटण येथे ८ किलो २२० ग्रॅम गांजा जप्त ; दांपत्यास अटक

8 kg 220 gm cannabis seized at Somwar Peth, Phaltan; The couple was arrested

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० डिसेंबर - सोमवार पेठ फलटण येथे बेकायदा, विनापरवाना स्वतःच्या फायद्याकरिता राहत्या घरात, गांजा विक्री करणाऱ्या दाम्पत्यास फलटण शहर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून ८,२२० किलो ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

    फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.०८/१२/२०२१ रोजी २.०० वाजता पोलीस निरीक्षक भारत किद्रे यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सोमवारपेठ, फलटण येथे  संजय रावबा गायकवाड व त्यांची पत्नी पंचशीला गायकवाड असे दोघे जण, त्यांच्या राहते घरी गांजाची  विक्री करीत आहेत, अशी बातमी मिळाल्याने पोलीस स्टेशन मधील उपलब्ध अधिकारी / स्टाफ व  पोलीस निरीक्षक भारत किंद्रे,  शासकीय वाहन व खाजगी वाहनाने सोमवारपेठ येथील वजनफाटाजवळ जाऊन आडोशाला जाऊन थांबले. 

    मिळालेल्या बातमीतील इसम संजय गायकवाड हा गांजा विक्री करीत आहे अशी खात्री झाल्याने, लागलीच उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग फलटण यांना घरझडती वारंट मिळणेकामी माहीती दिली. व  दोन शासकीय पंच, राजपत्रीत अधिकारी, वजनकाटा व वजनकाटाधारक तसेच फोटोग्राफर यांना बोलावून घेतले. सर्व पोलीस स्टाफ, पंच, राजपत्रीत अधिकारी, वजनकाटाबारक फोटोग्राफर असे सोमवारपेठेतील पत्राशेडकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या संजय रावबा गायकवाड यांच्या घरी दुपारी ३.२० वाजता जावून त्यांना घराची झडती घेण्याचा उद्देश समजावून सांगितला. त्याप्रमाणे पोलीस स्टाफ घरझडती घेत असतांना किचनच्या दरवाजाच्या लगत भिंतीस असलेल्या फर्निचरचे कपाटाचे खालील कप्यामध्ये पांढऱ्या रंगाचे प्लॅस्टीकचे पोत्यामध्ये खाकी रंगाची पॅकेट दिसून आले. ती सर्व पाकीट फोडून रिकाम्या पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये ओतून वजन केले असता ते ८,२२० कि.ग्रॅम इतके भरले. तो सर्व गांजा ताब्यात घेवून पुढील कारवाई करीता पोलीस ठाण्यात नेण्यात आला. त्यानंतर  १ संजय रावबा गायकवाड २. पंचशीला संजय गायकवाड दोन्ही रा सोमवार पेठ फलटण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ५ दिवस पोलीस कस्टडी अभिरक्षा मंजूर केला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक भारत किंद्रे करीत आहे.

    सदर कारवाई अजय कुमार बंसल पोलीस अधिक्षक सातारा, अजित बोऱ्हाडे अपर पोलीस अधिक्षक सातारा, तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली भारत किंद्रे पोलीस निरीक्षक फलटण शहर, एन आर गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक,पो.उपनि/शिंदे, म.पो.उप.नि.गायकवाड, पो.हवा  १६३४ काकडे, पो. हवा  ६६ काळुखे, शरद तांबे पो.ना. ३९३, सतीष दडस पो. ना. १०३७, पोना. १५५० मुळीक, पोना ५१२ कर्पे, पोहवा ३२० घाटगे, पो.कॉ. ५९२ सुजीत मँगावडे, पो.कॉ. २५२९ अच्युत जगताप, म.पो.हवा. २१०९ भोसले, म.पो. ना. १७२९ कोरडे, म.पो.कॉ.२५५७ कुंभार यांनी केलेली आहे.

No comments