Breaking News

20 शेळ्या व 2 बोकड असा शेळी गट वाटप योजनेसाठी पशुपालकांनी अर्ज करण्याचे आवाहन

Appeal to the cattle breeders to apply for goat group allotment scheme of 20 goats and 2 bucks

    सातारा   (जिमाका) : राज्यस्तरीय योजना मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर सन 2021-22 या वर्षात सातारा जिल्ह्यामध्ये “20 शेळ्या व 2 बोकड असा शेळी गट वाटप करणे” या योजनेसाठी निधी उपलब्ध झालाअसुन पशुपालकांनी योजनेचे परिपुर्ण अर्ज दि. 1 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीतच पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) संबंधित पंचायत समिती  यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली.

    या योजनेअंतर्गत शेळ्यांचा वाडा बांधकामासाठी व मोकळी जागा मिळून किमान 2000 चौ. फुट स्वत:ची जमीन, जागा लाभार्थ्यांकडे असणे आवश्यक आहे. एका शेळी गटाची किंमत रुपये 2 लाख 31 हजार 400  इतकी असून सर्व प्रवर्गांसाठी 50 टक्के अनुदान रुपये 1 लाख 15 हजार 700  देय असणार आहे.   गट स्थापनेच्या पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात 25 टक्के व दुसऱ्या सहा महिन्यात उर्वरित 25 टक्के याप्रमाणे लाभार्थीच्या बॅंक खात्यात अनुदान  जमा करण्यात येणार आहे.

    योजनेच्या अर्जसोबत सादर करावयाची कागदपत्रे व योजनेच्या सविस्तर माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) संबंधित पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा.   

No comments