Breaking News

फलटण नगर पालिका प्रशासनास सर्वपक्षीय पदाधिऱ्यांकडून दूषित पाणी भेट ; आमरण उपोषणाचा इशारा

Contaminated water gift from all party office bearers to Phaltan Municipal Administration

    फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) : फलटण शहराला गेल्या अनेक महिन्यापासून पिण्याचा दूषित पाणीपुरवठा होत असून घाण व दूषित पाणी पिल्याने अनेकांना विविध आजार झालेले आहेत. याकडे नगरपालिका लक्ष देत नसल्याने, आज  सर्वपक्षीय नेतेमंडळींनी नगरपालिकेत धडक देत अधिकाऱ्यांना दूषित पाणी भेट देऊन, आठ दिवसात स्वच्छ पाणीपुरवठा न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला.

     फलटण शहरातील सर्वच प्रभागामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. अनेकदा तोंडी,लेखी निवेदन देवून ही पाणी पुरवठा विभाग व मुख्याधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नागरिकांना कावीळ, उलटी,जुलाब या सारखे आजार बळावण्याचा धोका वाढला आहे. पाणी पुरवठा शुद्धीकरणसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही,  प्रशासन जनतेच्या जिवाशी खेळत आहे. या प्रशासनाच्या मनमानी   कारभाराला कंटाळून जनतेला आणि सर्वपक्षीय नेतेमंडळीना सोबत घेत,  नगर पालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा राष्टीय काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष आमिरभाई शेख यांनी दिला होता, मात्र पोलीस प्रशासनाच्या विनंतीनुसार मोर्चा ऐवजी सर्वपक्षीय निवेदन आणि दूषित पाण्याच्या बाटल्या भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे आज राष्ट्वादी काँग्रेस वगळता सर्वपक्षीय नेतेमंडळींनी  फलटण नगर पालिकेच्या आवारात येत, नगरपालिकेचे नगर अभियंता पंढरीनाथ साठे यांना निवेदन आणि दूषित पाण्याच्या बाटल्या भेट दिल्या तसेच येत्या आठ दिवसात फलटण शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी न दिल्यास नगरपालिकेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सर्वपक्षाच्या नेतेमंडळींनी यावेळी दिला.

   यावेळी राष्टीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र बेडके,कार्याध्यक्ष आमिरभाई शेख,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजिंक्य कदम, शहराध्यक्ष प्रीतम जगदाळे,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, शिवसेना तालुकाप्रमुख स्वप्नील मुळीक, शहरप्रमुख रणजित कदम, आझाद समाज पार्टीचे प महाराष्ट अध्यक्ष सनी काकडे, उपाध्यक्ष मंगेश आवळे,जिल्हा उपाध्यक्ष सूरज भैलुमे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे, रिपब्लिकन पक्ष तालुकाध्यक्ष संजय गायकवाड,उपाध्यक्ष रमेश चव्हाण, सिद्धार्थ दैठणकर,ताजुद्दीन बागवान,अल्ताफ पठाण, अशोक शिंदे, अमोल काळे, अजित मोरे, राहुल पवार, लक्ष्मण शिंदे, विजयकुमार भोसले आदी उपस्थित होते.

No comments