Breaking News

दिव्यांग व ज्येष्ठांसाठी कृत्रिम अवयव व साधनांचे होणार वाटप ; अण्णासाहेब कल्याणी महाविद्यालयात 15 व 16 डिसेंबर रोजी शिबीर

Distribution of artificial limbs and devices for the disabled and senior citizens; Camp on 15th and 16th December at Annasaheb Kalyani College

    सातारा  (जिमाका) :  केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत व जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा तालुक्यातील सर्व दिव्यांगांना व 60 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार कृत्रिम अवयव व साधने उपलब्ध करुन वाटप करण्यात येणार आहे. याचे शिबीर अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा येथे 15 डिसेंबर रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी व 16 डिसेंबर रोजी दिव्यांग नागरिकांसाठी आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सातारचे तहसीलदार, सातारा यांनी दिली आहे.

    शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना गरजेनुसार अलिम्को कानपूर, कुबड्या, कृत्रिम हात-पाय, श्रवणयंत्रे, विविध प्रकारच्या काठ्या, ब्रेल कीट्स, एम.आर. कीट्स, नंबरचा चष्मा, स्मार्ट फोन इत्यादी कृत्रिम अंग व साधने जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त प्रयत्नाने मिळवून देण्यात येणार आहे.

       कृत्रिम अवयव व साधने उपलब्ध करुन घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांने नागरी सुविधा केंद्राकडे नाव नोंदणी करुन घेण्यासाठी पुढील कागदपत्रे  आवश्यक आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्पन्न दाखला 1 लाख 80 हजाराच्या आतील, आधार कार्ड, रेशनकार्ड व 2 फोटो. दिव्यांगांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र (सिव्हील सर्जन यांचे) उत्पन्न दाखला 1 लाख 80 हजाराच्या आतील, आधार कार्ड, रेशनकार्ड व 2 फोटो. 15 व 16 डिसेंबर रोजी होणाऱ्या या शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही तहसीलदार, सातारा यांनी केले आहे.

No comments