|
जिल्हा क्रॉसकंट्री स्पर्धेचे कॅम्पेनिंग करताना महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्राचार्य गंगावणे सर व इतर मान्यवर (छाया - योगायोग फोटो) |
District Crosscountry Competition at Phaltan; District teams will be selected for the state cross country from the competition
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १४ डिसेंबर - सातारा जिल्हा ॲम्युचर ॲथलेटिक्स असोसिएशन व फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन आणि फलटण जिमखाना, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रॉसकंट्री निवड स्पर्धा २०२१- २२ चे आयोजन दि.१९ डिसेंबर २०२१ सकाळी ७ : ३० वाजता, सजाई गार्डन, गिरवी नाका नजीक, फलटण जि. सातारा येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेतून राज्य क्रॉसकंट्री स्पर्धेकरीता जिल्हा संघ निवडण्यात येणार आहे. स्पर्धेचा शुभारंभ महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी नगराध्यक्षा सौ. निता मिलिंद नेवसे, नगरसेवक, नागरसेविका उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा क्रॉसकंट्री निवड स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ, स्पर्धा संपल्यानंतर, त्याच ठिकाणी सकाळी ९ : ३० वाजता फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दिपकराव चव्हाण, पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, जाधववाडी सरपंच सीमा आबाजी गायकवाड, व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न होणार आहे.
जिल्हा क्रॉसकंट्री निवड स्पर्धेत १) १४ वर्षे मुले व मुली गटासाठी १.५ किमी २) १६ वर्षे मुले व मुली गटासाठी २ किमी ३) १८ वर्षे मुले गटा साठी ६ किमी, मुली गटासाठी ४ किमी ४) २० वर्षे मुले गटा साठी ८ किमी, मुली गटासाठी ६ किमी ५) खुला गट पुरुष व महिला गटासाठी १० किमी अंतर असणार आहे.
सदर स्पर्धेसाठी प्रवेशिका विहित नमुन्यात व वेळेत खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर व्हॉटसअप किंवा Email Id - sataraathletics21@gmail.com यावर दिनांक १८ डिसेंबर २०२१ सकाळी १० पर्यंत पाठवाव्यात किंवा खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
नामदेव मोरे सर 9960082120
तायप्पा शेंडगे सर 9322748199
अॅड.रोहित अहिवळे 9960885007
सचिन धुमाळ सर 9890382204
तुषार मोहिते सर 9423888344
जिल्हा क्रॉसकंट्री निवड स्पर्धेसाठी खेळाडूंनी स्पर्धेसाठी येताना जन्मतारखेचा मूळ दाखला ग्रामपंचायत / नगरपालिका किंवा १०वी, १२वी बोर्ड सर्टिफिकेट आणणे आवश्यक आहे. इतर कोणताही दाखला ग्राह्य धरण्यात येणार नाही. सदर स्पर्धेतील १६ व १८ वयोगटातील प्रथम २ तर २० व खुल्या गटातील प्रथम ६ खेळाडूंची राज्य स्पर्धेकरिता जिल्हा संघात निवड करण्यात येईल. १४ वर्षाखालील मुले व मुलींची स्पर्धा जिल्हा स्तर मर्यादित राहिल. या खेळाडूंची राज्यस्पर्धेकरिता निवड करण्यात येणार नाही. सदर स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्रक व सन्मान चिन्ह व रोख बक्षीस देवून सन्मानित करण्यात येईल. परगावच्या खेळाडूंची राहण्याची व भेजनाची व्यवस्था स्पर्धेच्या ठिकाणी करण्यात आली आहे. स्पर्धेत महाराष्ट्र शासनाने कोविड- १९ संदर्भात जारी केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार असल्याचे फलटण तालुका असोसिएशन व फलटण जिमखाना यांनी कळवले आहे.
No comments