अटल भूजल योजनेची जिल्हा नियोजन व समन्वय समितीची बैठक संपन्न
सातारा दि. 3 (जिमाका) : केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजनेची जिल्हा नियोजन व समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, कार्यकारी अभियंता जलसंपदा अमर काशीद, कार्यकारी अभियंता (विजवितरण) किरण सुर्यवंशी, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.) जि. प. एस. एस. शिंदे व जिल्हानियोजन समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या योजनेतील गावांची निवड कशी झाली व बनविण्यात आलेल्या जलसुरक्षा आराखड्यांची सविस्तर माहिती घेतली.
केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल (अटल जल) योजने अंतर्गत प्रथम टप्पा पूर्ण झाला असून, द्वितीय टप्प्या अंतर्गत जलसुरक्षा आराखडे तयार करणयचे काम प्राधान्याने सुरु आहेत. आजपर्यंत माण, खटाव व वाई तालुक्यातील एकुण 16 गावांचे जलसुरक्षा आराखडे तयार झाले आहेत. उर्वरित 98 गावांचे जलसुरक्षा आराखडे तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. प्रमोद रेड्डी यांनी दिली .
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी या योजनेत सुक्ष्म सिंचनाकरिता, पाणी बचतीच्या उपाययोजना राबविण्याकरीता अतिरिक्त अनुदान प्राप्त झाल्यास ही योजना प्रभावीपणे राबविता येईल असे सांगितले.
No comments