लोकाभिमुख नेतृत्व असणारे छ. उदयनराजे व साताराचे समिकरण बरकरार राहील - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० डिसेंबर - सातारा भाजपचे जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर यांनी फलटण येथे सातारा खासदारकी वरून मैत्रीत थट्टेने विधान केले होते, त्याचा विपर्यास होऊन, गैरसमज निर्माण होत आहे, त्यात छ. उदयनराजे यांना दुखवण्याचा कोणताही हेतू नव्हता. लोकाभिमुख नेतृत्व असणारे छत्रपती उदयनराजे व सातारा हे वेगळे समिकरण आहे , आणि ते बरकरार राहील असे स्पष्टीकरण माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.
फलटण येथील एका कार्यक्रमात सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांनी भाषण करताना रणजीतसिंह निंबाळकर हे साताराचे खासदार व्हावेत अशा आशयाचे वक्तव्य केले होते. यावरून विविध वृत्तपत्र चॅनल वरून या बातम्या झळकल्या, यावर माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केलेल्या एका विधानाचा गैरसमज झाला असल्याचे म्हटले असून, छत्रपती उदयनराजे व आपण खूप जवळचे मित्र आहोत, पावसकरांनी जे विधान केले ते, माझे व खासदार उदयनराजे यांच्यात असणाऱ्या संबंधावर, त्यांनी चेष्टा-मस्करीत केलेलं विधान होतं, त्यात उदयनराजेंना कुठेही दुखावण्याचा हेतू मुळीच नव्हता आणी माझा कधीही तसा हेतू नसणार आहे.
छत्रपती उदयनराजे हे दिलखुलास व दिलदार स्वभावाचे साताऱ्याचे राजे आहेत, ज्यांनी माझ्यासाठी नीरा देवधर सारख्या विषयावर स्वपक्षाशी संघर्ष करायला देखील मागेपुढे पाहिले नाही. लोकाभिमुख नेतृत्व असणाऱ्या छत्रपती उदयनराजे यांनीच सातारा मधून खासदारकी मिळवावी हीच माझी इच्छा आहे, माढ्यातील जनतेने मी अनोळखी असताना, माझ्यावर खूप प्रेम केले आहे, तेव्हा भविष्यात भाजपाला मला संधी द्यायची असेल तर ती माढ्यातूनच द्यावी अशी माझी भाजीपालाही विनंती राहणार आहे, छ. उदयनराजे व सातारा हे वेगळेच समिकरण आहे, आणि ते बरकरार राहील असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
No comments