समाजातील प्रत्येक घटकाने सन्मानाने जगले पाहिजे - प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे
सातारा (जिमाका) : राज्यघटनेने समाजतील प्रत्येक घटकाला केवळ जगण्याचा नव्हे तर सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. एड्स संसर्गीतांना आरोग्य पूर्ण जिवन जगण्यासाठी व सन्माने जगण्यासाठी मदत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी केले.
स्व्. क्रांतिसिंहनाना पाटील जिल्हा रुग्णालयात आज जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे बोलत होत्या. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्यचिकत्सक डॉ. सुभाष चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) धनंजय चोपडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र जाधव यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे म्हणाले, एड्स असो किंवा कोविड सारखी महामारी असो, एड्स नियंत्रण विभागाच्या व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला धैर्याने तोंडदिलेले आहे. ज्या पद्धतीने एड्स नियंत्रणात आणाला आहे त्याच पद्धतीने कोविड नियंत्रणासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी योगदान द्यावे.
एड्स नियंत्रण कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व कर्मचाऱ्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी उपस्थितांना जागतिक एड्स दिनानिमित्त शपथ दिली
No comments