Breaking News

सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर (STI) ; बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर

List of names and marks boundaries of eligible candidates of State Tax Inspectors along with meeting number on the Commission's website

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२०

    मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ४ सप्टेंबर, २०२१ रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२० घेण्यात आली होती. प्रस्तुत परीक्षेमधून राज्य कर निरीक्षक (सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर) संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल दिनांक १ डिसेंबर, २०२१ रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत संवर्गाकरीता पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

    परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.

    आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. मुख्य परीक्षेचा संयुक्त पेपर क्रमांक १ दिनांक २२ जानेवारी, २०२२ व पेपर क्र. २ दिनांक १२ फेब्रुवारी, २०२२ रोजी घेण्यात येईल.
परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या/समांतर आरक्षणाच्या मुद्यांसंदर्भात विविध न्यायालयात/ न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे.    

    पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) कळविण्यात येईल.

मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरीता स्वीकारार्ह ठरतील.

No comments