अजैविक कीटकनाशकांवर निंबोळी अर्क ठरणार पर्याय
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ६ डिसेंबर - ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न कृषी महाविद्यालय आचळोली या महाविद्यालयातील अंतिम वर्षातील साक्षी परबती लोखंडे या विद्यार्थिनीने फलटण तालुक्यातील ढवळ गावातील शेतकऱ्यांना निंबोळी अर्क निर्मिती व त्याचा वापर यांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
प्रथम तिने शेतकऱ्यांना निंबोळी अर्क कसे तयार करायचे त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यानंतर शेतीसाठी निंबोळी अर्काचे होणारे फायदे सांगितले. कीड यांवर परिणाम वापराची पद्धत व त्यात असलेल्या अझटोबॅक्टर द्रवणामुळे ते कीटकनाशकाचे काम करते असेही सांगितले, तयार झालेल्या निंबोळी अर्काचे वापर तिने मका या पिकावर करून दाखवला. यावेळी परिसरातील शेतकरी मोहन लोखंडे, रूपाली लोखंडे ,विजया लोखंडे उपस्थित होते.
निंबोळी आर्कचे प्रात्यक्षिक पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वैभव गिम्हवणेकर, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापिका विद्या पवार, कार्यक्रम आधिकारी संदीप संकपाळ तसेच विषय तज्ञ प्राध्यापक राहते सर यांनी मार्गदर्शन केले.
No comments