Breaking News

दिव्यांग व ज्येष्ठांना कृत्रिम अवयव व साधने वाटपासाठी सातारा जिल्ह्यात विशेष शिबीरांचे आयोजन

Organizing special camps in Satara district for distribution of artificial limbs and equipments to the disabled and senior citizens

    सातारा  (जिमाका) :  सातारा जिल्ह्यातील  सर्व प्रकारच्या गरजू दिव्यांगांना व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व साधने पुरविणे या केंद्र शासनाच्या  सामाजिक न्याय व अस्थिव्यंगाकरिता मंत्रालयाच्या  व राष्ट्रीय वयोश्री योजना (RVY) या योजनेद्वारे जिल्हा प्रशासनाकडून लाभ मिळवून देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सातारा, कराड, फलटण, वाई व महाबळेश्वर  तालुक्यांसाठी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीराच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसही उपलब्ध करण्यात येणार असून ज्या दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला नाही, अशांनी शिबीराच्या ठिकाणी करोना प्रतिबंधक लसीचा डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

    या  योजनेंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना गरजेनुसार व अलिम्को कानपूर, उत्तरप्रदेश येथील तज्ञांच्या सल्ल्याने तीन चाकी सायकल,व्हील चेअर, मोटारइज्ड ट्रायसायकल, कॅलिपर्स, कुबड्या, कृत्रीम हात-पाय, श्रवणयंत्रे, विविध प्रकारच्या काठया,  ब्रेल कीटस्, एम.आर.किटस्, नंबरचा चष्मा, स्मार्ट फोन इत्यादी कृत्रीम अंग व साधने जिल्हा प्रशासन, सातारा व जिल्हा परिषद, सातारा यांच्या संयुक्त  प्रयत्नाने मिळवून देण्यात येणार आहे.

 ही कृत्रिम अवयव व साधने उपलब्ध करुन घेण्यासाठी संबंधीत लाभार्थ्यांने नागरी सुविधा केंद्राकडे नाव नोंदणी करुन घ्यावी त्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रक आवश्यक आहेत.

दिव्यांगाकरिता  :  सिव्हील सर्जन यांचा दिव्यांगत्वाचा वैद्यकीय दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार/तलाठी/नगरसेवक) वार्षिक उत्पन्न रु. 180000/-, दोन पासपोर्ट साईज फोटो.

    ज्येष्ठ नागरिकांसाठी  - आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार/तलाठी/नगरसेवक), दोन पासपोर्ट साईज फोटो, वय वर्ष 60 किंवा त्यापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न रु. 180000 पर्यंतच्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडाव्यात.

 या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दोन टप्प्यात शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

पहिला टप्पा

1.सातारा तालुका : 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता दि. 15 डिसेंबर 2021, दिव्यांगाकरिता दि. 16 डिसेंबर 2021

2.कराड तालुका : दिव्यांगाकरिता दि. 17 डिसेंबर 2021, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता दि. 18 डिसेंबर 2021

3.फलटण तालुका : दिव्यांगाकरिता दि. 19 डिसेंबर 2021, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता दि. 20 डिसेंबर 2021

4.वाई तालुका : दिव्यांगाकरिता दि. 21 डिसेंबर 2021, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता दि. 22 डिसेंबर 2021

5.महाबळेश्वर तालुका : दिव्यांगाकरिता दि. 23 डिसेंबर 2021, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता दि. 24 डिसेंबर 2021.

   दुसऱ्या टप्प्यामध्ये दि. 28 जानेवारी 2022 पासून उर्वरित तालुक्यांमध्ये मोजमाप शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

No comments