परदेशातून फलटण मध्ये आलेल्या नागरिकांची रॅपिड कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह ; आरटीपीसीआर व ओमिक्रॅान चाचणी होणार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा ) दि. १३ डिसेंबर - फलटण शहरात परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे, त्यांना ओमीक्रॉन झाल्याच्या शक्यतेमुळे फलटण शहरात घबराटीचे वातावरण पसरले होते, परंतु फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार फलटण शहरामध्ये परदेशातून दाखल झालेल्या व्यक्तींची दि १२/१२/२०२१ रोजी प्राप्त यादीतील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती आज रॅपिड टेस्टमध्ये कोविड पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. ( त्याच कुटुंबातील २ व्यक्ती लहान असल्याने रॅपिड टेस्ट घेण्यात आली नव्हती)
सदर व्यक्तींना शासकीय रुग्णालयात आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले असून, त्यांचे आरटीपीसीआर RTPCR नमुने घेऊन पुढील तपासणीसाठी सातारा येथे पाठवण्यात आले आहेत. तेथून पुढे ओमिक्रॅान जिनोम सिक्वेन्सींग ला पाठवण्यात येतील.
कॅान्टॅक्ट ट्रेसींगमध्ये फलटण शहरातील कोणीही आढळून आलेले नाही मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी. कोविडच्या सर्व निर्देशांचे पालन करावे व लसीकरणाचे दोन्ही डोस घ्यावेत असे आवाहन आणि उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.
No comments