Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना व राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करणं हेच आपल्या सर्वांचं कर्तव्य : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

Shrimant Sanjeevraje greeted Babasaheb Ambedkar on the occasion of Mahaparinirvana Day

महापरिनिर्वाणदिनानिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना  श्रीमंत संजीवराजे यांचे अभिवादन

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) ६ डिसेंबर -  : डॉ.बाबासाहेब आंबडेकरांनी आपल्याला ‘शिका आणि संघटीत व्हा’ अशी शिकवण दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंध, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचं श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि डॉ.बाबासाहेबांच्या दूरदृष्टीलाच आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना व राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प करुया, असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी व्यक्त केले.  

    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलटण येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने यांच्यासह मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments