Breaking News

श्रीराम बझारची निवडणूक बिनविरोध

Shriram Bazar's Directors election done unopposed

    फलटण : फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील अग्रगणी असलेल्या श्रीराम बझार म्हणजेच श्रीराम शेतकरी कामगार सहकारी ग्राहक संस्था, फलटण या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. संस्थेचे माजी चेअरमन महादेवराव पवार, जितेंद्र पवार व माजी व्हाईस चेअरमन दिलीप भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली सदरील निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून फलटणचे सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे यांनी कामकाज पाहिले.

    सदर झालेल्या निवडणुकीनंतर बिनविरोध निवडून गेलेल्या संचालकांचे विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

    नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये नितीन शाहुराज भोसले (रा. होळ, ता. फलटण), जितेंद्र महादेवराव पवार (रा. पवारवाडी, ता. फलटण), अनिल दत्तात्रय रणवरे (रा. जिंती, ता. फलटण), जयकुमार अरविंद शिंदे (रा. कोळकी, ता. फलटण), धनंजय बाळासाहेब पवार (रा. पवारवाडी, ता. फलटण), माधवी हणमंतराव पवार (रा. लक्ष्मीनगर, फलटण), दिलीपसिंह ग्यानोबा भोसले (रा. ललक्ष्मीनगर, फलटण), रविंद्र सिताराम बेडकीहाळ (रा. लक्ष्मीनगर, फलटण), तेजसिंह दिलीपसिंह भोसले (रा. लक्ष्मीनगर, फलटण), तुषार श्रेणिक गांधी (रा. लक्ष्मीनगर, फलटण), राजाराम विश्वनाथ फणसे (रा. शुक्रवारपेठ, फलटण), मारूती शंकर गावडे (रा. गोखळी, ता. फलटण), बापुराव सोपान गावडे (रा. गुणवरे, ता. फलटण), चंद्रकांत नारायण शिंदे (रा. शिंदेनगर, ता. माळशिरस), आनंदराव सुधाकर बेलदार (रा. सांगवी, ता. फलटण), महादेवराव दिनकरराव पवार (रा. पवारवाडी, ता. फलटण), शितल दादा अहिवळे (रा. मंगळवारपेठ, फलटण), आनंदराव नामदेवराव शिंदे (रा. साठेफाटा, ता. फलटण), सुभाष महादेव कर्णे (रा. गुणवरे, ता. फलटण), प्रभावती दिलीप गरूड (रा. जिंती, ता. फलटण), पद्मावती हणमंतराव पवार (रा. लक्ष्मीनगर, फलटण) यांचा समावेश आहे.

No comments