फलटणची श्रीराम रथयात्रा : गाडीतून प्रभू रामाची नगर प्रदक्षिणा संपन्न
फलटण -: श्रीराम मंदिर व मुधोजी मनमोहन राजवाड्यातील देवघरात प्रभू श्रीराम, सीतामाता व अन्य देवतांचे पूजन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत शिवांजलीराजे यांनी केली. श्रीराम, सीतामातेच्या मूर्तीची विधीवत पूजा व आरती केली. त्यावेळी सर्व मानकरी व नाईक निंबाळकर घराण्यातील मान्यवर, शासकीय अधिकारी, भाविक व ट्रस्टचे अधिकारी व त्यांचे सहकारी उपस्थित होते. त्यानंतर पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये श्रीराम पादुका नगर प्रदक्षिणेसाठी नेण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारंपारिक श्रीराम रथयात्रा मोठ्या उत्सवात साजरी केली नसली तरी धार्मिक विधी विधिवत करण्यात आले.
नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने गेली सुमारे २५० वर्षाहुन अधिक काळ प्रतिवर्षी मार्गशीर्ष शु|| प्रतिपदा म्हणजे देवदिवाळी दिवशी लाखोंच्या उपस्थितीत भरणारी येथील श्रीराम रथोत्सव यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी परंपरागत पद्धतीने आदल्या दिवशी रथपूजन, आज सर्व मूर्तींचे पूजन, आरती व त्यानंतर प्रभू श्रीरामाच्या मूर्ती गाडीत ठेवून नगर प्रदक्षिणा करण्यात आली.
No comments