Breaking News

सातारा जिल्ह्यातील प्रयोगशील शिक्षकांचा राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्कार देऊन गौरव

State level Mahatma Jyotirao Phule Honorary Satyashodhak Shikshak Puraskar for experimental teachers in Satara district

     फलटण (प्रतिनिधी) -  राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ अंतर्गत प्रोटान (प्रोफ़ेसर्स, टीचर्स एंड नॉन टीचिंग एम्प्लाइज विंग) संघटनचे 3 रे महाराष्ट्र राज्य अधिवेशन सोलापुर येथे संपन्न होत झाले. राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ट्रेड यूनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा  सोलापुर प्रोटान अधिवेशनाचे अध्यक्ष मूलनिवासी नायक मा. वामन मेश्राम साहेब यांच्या हस्ते सोलापूर येथे पुरस्कार वितरण करण्यात आले. दरवर्षी या अधिवेशनात संघटनेकडून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत सत्यशोधक प्राध्यापक/ शिक्षक पुरस्कार, क्रांतिज्योति सावित्रीमाई फुले गुणवंत सत्यशोधिका शिक्षिका आणि कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे गुणवंत सत्यशोधक शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार देण्यात येतात. 

    या वर्षी आपल्या सातारा जिल्हयातुन राज्यस्तरीय राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत सत्यशोधक प्राध्यापक पुरस्कार मा.प्रा.शिवाजी सुबराव पाटील, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, मा. लेफ्टनंट.प्रा. केशवराव पवार, छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा यांना तर राष्ट्रपिता महात्मा फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्कार प्रा. विक्रम नागनाथ कदम,लोकराजा राजर्षी शाहू शिक्षण संस्था. सातारा, सोमनाथ पोपट घोरपडे, कमला निंबकर बालभवन,फलटण आणि संतोष मनोहर कोरडे, श्री.छत्रपती शिवाजी विद्यालयात,अपसिंगे.(मि.) यांना सोलापूर येथे प्रदान करण्यात आला. 

सोमनाथ पोपट घोरपडे यांना पुरस्कार प्रदान करताना वामन मेश्राम साहेब

    सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सातारा प्रोटान जिल्हा कार्यकारणी अध्यक्ष सतिश गायकवाड, मा. लेफ्टनंट प्रा.केशवराव पवार, पुरुपोत्तम सावंत, राजेश शिंगाडे, प्राचार्य मोहनराव शिर्के यांनी सर्वांचे अभिनंदन केले. 

    या अधिवेशनात नवीन शैक्षणिक धोरण,नवे कामगार कायदे, DCPS /NPS पेंशन योजना,खाजगीकरण, भविष्यातील आव्हाने, शिक्षकांच्या निर्माण झालेल्या समस्या, त्यावर उपाययोजना प्रोटान संघटनची भूमिका यावर तज्ञ अभ्यासू ,अनुभवी मान्यवराकड़ून मार्गदर्शन करण्यात आले.  

No comments