नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध ; अधिकाऱ्यांनी नागरिकांना सहकार्य करावे - सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. आगामी काळात सर्वसामान्य शेतकरी, शेतकऱ्यांचे पाल्य व सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी काम करताना गट - तटाचा विचार न करता, सर्व शेतकरी व नागरिकांना समान न्याय देऊन सहकार्य करावे अशा सूचना पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी दिल्या.
फलटण पंचायत समितीमधील मिटींग हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये श्रीमंत विश्वजीतराजे यांनी विविध योजनांचा आढावा घेऊन, अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. त्यावेळी श्रीमंत विश्वजीतराजे बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती संजय सोडमिसे, फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.सौ.अमिता गावडे (पवार), डेप्युटी इंजिनिअर सुनील गरुड, आरोग्य अधिकारी डॉ.विक्रांत पोटे, संग्राम कोळेकर साहेब, तवटे साहेब, पशुसंवर्धन अधिकारी उपस्थित होते.
फलटण पंचायत समितीच्या अंतर्गत येणारा कृषी विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि जल संजीवनी योजना, विद्युत योजना, पशुसंवर्धन विभागा राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व पंचायत समिती स्तरीय योजना असतील, शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तक योजना, मोफत गणवेश वाटप योजना, मध्यान भोजन योजना सर्व शिक्षण सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत येणारे सर्व उपक्रम अंगणवाडीच्या मध्यमातून बालकांसाठी राबविण्यात येत असणाऱ्या विविध योजना व आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या विविध योजनांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांच्या कडून माहिती घेऊन या योजनाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात याव्यात अशा सूचना फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजितराजे यांनी दिल्या.
अधिकाऱ्यांनी, काम करीत असताना, काही अडचणी आल्या तर, माझ्या कानावर घालाव्यात, तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून चांगली कामे व्हावीत. माझी काम करण्याची पद्धती ही सर्वांना बरोबर घेऊन जाणारी असून, मी पंचायत समितीचा सभापती म्हणून काम करीत असताना, गटातटाच्या विचार करणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्यासाठी मला आपल्या सर्व अधिकाऱ्यांचे सहकार्य होणे अपेक्षित आहे.यापुढे हे मी विभागवार सविस्तर माहिती जाणून घेवून त्याची अंमलबजावणी तात्काळ करणार असल्याचेही शेवटी श्रीमंत विश्वजीतराजे यांनी सांगितले.
No comments