आदर्की गावाला विकास निधी कमी पडू देणार नाही - अॅड.जिजामाला नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - आदर्की गावांमध्ये खासदार साहेबांच्या माध्यमातून तरुणांचे योग्यप्रकारे संघटन तयार होत आहे, आगामी काळात खा. रणजितसिंह यांच्या माध्यमातून, आदर्की गावाला कोणत्याही प्रकारचा विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. आदर्की गावावर आमचे विशेष लक्ष असून गावातील ग्रामस्थांना पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी दिले.
माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजीतसिंह हिंदुरावजी नाईक निंबाळकर तसेच जिल्हा परिषद आणि नियोजन समिती सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या फंडातून विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी अॅड. जिजामाला बोलत होत्या. यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत भैय्या नाईक निंबाळकर तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता श्री.पात्रेकर साहेब, आदर्की ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अहिरेकर अण्णा, कॉन्ट्रॅक्टर रणजित शिंदे, वायरमन श्री संतोष कुंभार इत्यादी उपस्थित होते.
श्री क्षेत्र वाघजाई देवीच्या मार्गावरील, बेलजाई येथील ओढयावर, साकव पुलाचे तसेच स्ट्रीट लाईट आणि गावडीपी तसेच पोळ डीपी वरील ॲडिशनल डीपी चे भूमिपूजन अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य अमोल बोडके यांनी असे सांगितले की, खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर यांच्या विचाराच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असून येणाऱ्या काळात देखील सर्व गावातील युवकांना, ज्येष्ठांना बरोबर घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडण्याचं काम खासदार साहेबांच्या माध्यमातून निश्चित पणे करू.
विकास निधी मंजूर केल्याबद्दल खासदार साहेबांचे आणि वहिनीसाहेबांचे या ठिकाणी सर्व आदर्कीतील ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी उपस्थित ,बापूसाहेब निंबाळकर, प्रवीण बोडके, सूर्यकांत निंबाळकर ,सचिन निंबाळकर, महेंद्र निंबाळकर ,नंदकिशोर निंबाळकर , नारायण देशमुख,संजय रामचंद्र निंबाळकर , दत्तात्रय निंबाळकर (काका) ,दिलीप निंबाळकर ,सदाशिव काकडे, सुनील काकडे ,मारूती काकडे, वैभव गायकवाड ,प्रमोद निंबाळकर, हनुमंत निंबाळकर ,बाळासाहेब निंबाळकर, संतोष डोंबाळे, संतोष जाधव, इत्यादी ग्रामस्थ तसेच महिलावर्ग देखील बहुसंख्येने उपस्थित होता.
No comments