फलटण तालुक्यात 89 कोरोना पॉझिटिव्ह ; शहरात 22, कोळकी 17
फलटण दि. 30 जानेवारी 2022 (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. 29 जानेवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 89 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 22 रुग्ण तर ग्रामीण भागात 67 रुग्ण सापडले आहेत. तालुक्यात सर्वात जास्त कोळकी येथे 17 बाधित रुग्ण सापडले आहेत
दि. 29 जानेवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 89 बाधित आहेत. 89 बाधित चाचण्यांमध्ये 39 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर 50 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 22 तर ग्रामीण भागात 67 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात कोळकी 17, मानेवाडी 1, पिंपरद 3, विडणी 6, जाधववाडी 4, निरगुडी 1, गिरवी 1, पाडेगाव 3, कापडगाव 1, सासवड 1, सोनवडी बु 3, सालपे 1, सुरवडी 1, दालवडी 1, दुधेबावी 2, वाठार निंबाळकर 1, आळजापुर 1, गुणवरे 1, ठाकूरकी 2, बरड 1, कापशी 1, जिंती 1, फरांदवाडी 3, रावडी बुद्रुक 1, सरडे 1, सोमंथळी 1, तरडगाव 1, ताथवडा 3, आंदोरी तालुका खंडाळा 1, कोल्हापूर 1, पुणे 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments