Breaking News

बेटी बचाओ-बेटी पढाओ अंतर्गत जिल्हास्तरावरील टास्क फोर्सची बैठक संपन्न

District level task force meeting held under Beti Bachao-Beti Padao

    सातारा दि.27: बेटी बचाओ-बेटी पढाओ अंतर्गत जिल्हा स्तरावरील टास्क फोर्सची आढावा बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली.

   यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, महिला व बाल विकास अधिकारी तथा अभियानाच्या  सदस्य सचिव रोहिणी ढवळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक अर्चना वाघमळे व समाज कल्याण अधिकारी ( जिल्हा परिषद) सपना घोळवे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांच्यासह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.

     या बैठकीत सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन जिल्ह्यामध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान यशस्वीपणे राबविण्यात यावे. तसेच शाळा बाह्य मुलींना आरोग्य व शैक्षणिक सुविधा, माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ योग्य लाभार्थींना देणे आदि विषयावर चर्चा करण्यात आली.  तसेच डिस्ट्रीक्ट ॲक्शन प्लॅन 2021-22 अंतर्गत आयोजित करावयाच्या कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली.

            जिल्ह्यात 1496 ग्राम बाल संरक्षण समित्या कार्यन्वित आहेत. राष्ट्रीय पोषण अभियानात व तरंग सुपोषित  महाराष्ट्राचा या अभियानात सातारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

    गर्भलिंग निदानास प्रतिबंध करणे आणि मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविणे, मुलीच्या  अस्तित्वाचे व जीवीताचे संरक्षण करणे, मुलीच्या शिक्षणात प्रोत्साहन देणे व शिक्षणातील सहभाग वाढविणे, मुलींची शाळेतील गळती रोखणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

No comments