Breaking News

खाजगी सावकारकी ; सुरवाडी येथील दोघांविरोधात गुन्हा दाखल

Filed a money laundering case against both of them at Surwadi

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  जानेवारी - व्याजाने दिलेल्या पैशाची परतफेड व व्याजाचे पैसे द्यायला जमत नसेल तर साठेखत करून दिलेली जमीन नावावर करून दे, अशी दमबाजी करणाऱ्या, सुरवाडी येथील दोघांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला खाजगी सावकारीकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे सुरवडी तालुका फलटण गावचे हद्दीत दि . 01/01/2011 ते 01/01/2022 पर्यंत धनाजी उर्फ धनंजय पांडुरंग साळवे रा. सुरवडी तालुका फलटण जिल्हा सातारा यांनी, अविनाश रघुनाथ जगताप यांना जानेवारी 2011 मध्ये व्याजाने बेकायदेशीररीत्या 70 हजार रुपये दिले होते, त्या बदल्यात जगताप यांनी 1 लाख 46 हजार रुपये परत दिले, व्याजाचे पैसे वेळेवर येत नसल्याने, साळवे यांनी  अविनाश रघुनाथ जगताप यांना  शिवीगाळ दमदाटी केली. तसेच जानेवारी 2012 मध्ये  संतोष बाबुराव साळुंखे रा. सुरवडी यांच्याकडून एक लाख पंचवीस हजार रुपये 12.5 टक्क्यांनी घेतले होते, त्या मोबदल्यात अविनाश रघुनाथ जगताप यांनी जानेवारी 2013 ते सन 2015 पर्यंत व्याजापोटी दोन लाख 64 हजार पाचशे रुपये, त्यामधील एक लाख रुपये चेकने दिले होते, तसेच सदर चे व्याजाचे पैसे वेळेवर न दिल्याने अविनाश रघुनाथ जगताप यांना सावकाराने शिवीगाळ दमदाटी केली आहे,  सन 2016 मध्ये अविनाश रघुनाथ जगताप यांना पैशाची गरज होती, गावांमध्ये कोणीही त्यांना पैसे देत नव्हते, त्यावेळी वर नमूद दोन्ही सावकारांनी  अविनाश रघुनाथ जगताप यांच्या जमीन गट नंबर 470 मधील 22 गुंठे जमीन साठेखत करून घेतली, त्यामध्ये त्यांनी सहा लाख 80 हजार रुपये दिल्याचे लिहले, परंतु त्यांनी अविनाश रघुनाथ जगताप यांना रोख   1 लाख साठ हजार रुपये दिले व राहिलेले 5 लाख वीस हजार रुपये हे पाठीमागील 2011 व 2012 मधील दिलेल्या पैश्यापैकी 3 लाख 40 हजार रुपये व्याज व चालू दिलेले पैशाचे 1 लाख 80 हजार अगाऊ व्याज असे पाच लाख वीस हजार रुपये व्याजापोटी घेतले. वास्तविक अविनाश रघुनाथ जगताप यांनी वर नमूद दोन्ही सावकारांकडून एकूण  3 लाख 55 हजार रुपये रोख असे व्याजाने घेतली होते, त्या बदल्यात अविनाश रघुनाथ जगताप यांनी त्यांना वेळोवेळी 9 लाख 30 हजार 500 रुपये व्याजापोटी दिले असे असताना सुद्धा, सावकार अजून व्याजापोटी 6 लाख 80 हजार रुपये मागत आहेत, तसेच गेल्या पंधरा दिवसापूर्वी आरोपी हे घरी येऊन व्याजाचे पैसे द्यायला जमत नसेल तर, तू आम्हाला साठेखत करून दिलेली जमीन, आमच्या नावावर करून दे, असे म्हणून दमदाटी करत असल्याची फिर्याद अविनाश रघुनाथ जगताप यांनी दिली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अरगडे हे करीत आहेत.

No comments