Breaking News

स्वरूप अहिवळे व अक्षय अहिवळे यांचे सेट परीक्षेत यश ; मंगळवार पेठेत सत्कार संपन्न

स्वरूप संजय अहिवळे व अक्षय महादेव अहिवळे यांचा सत्कार करताना माजी नगरसेवक सचिन अहिवळे, विशाल पाटील, अनिकेत अहिवळे
Swaroop Ahiwale and Akshay Ahiwale pass in Set Exam

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ फेब्रुवारी -  शिक्षण म्हणजे वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय, फलटण येथील मंगळवार पेठेतील तरुण स्वरूप संजय अहिवळे व अक्षय महादेव अहिवळे यांनी सेट परीक्षा पास करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. परिस्थिती यशाला कधीही आडवी येत नाही, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.अशा गुणवंत तरुणांचा सत्कार करणे, त्यांच्या पाठीवरती शाब्बासकीची थाप मारणे हे खूप गरजेजे आहे, हे ओळखूनच फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक सचिन अहिवळे  यांनी, या दोघांचा सन्मान करून दोघांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली.

    फलटणच्या मंगळवार पेठेतील स्वरूप संजय अहिवळे हे फलटण नगर परिषदेत सफाई कर्मचारी म्हणून २००४ ला रुजू झाले. त्यानंतर त्यांनी फलटण येथील मुधोजी महाविद्यालयातून २००७ साली आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. व नंतर बारामतीच्या टी.सी. कॉलेजमधून २०११ साली पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. यादरम्यान स्वरूप यांचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर नगरपरिषदेमध्ये काम करत असताना, स्वरूप यांनी दुसऱ्या बाजूला अभ्यास सुरू ठेवत,  सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा पूर्ण केला व त्यानंतर त्यांनी सप्टेंबर २०२१ साली पुणे विद्यापीठातून सेट ची परीक्षा दिली. दि. २८ जानेवारी २०२२ रोजी सेट परीक्षेचा निकाल लागला त्यामध्ये ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.

    अक्षय महादेव अहिवळे हे  मुधोजी महाविद्यालय फलटण येथे तासिका तत्वावर शिक्षक म्हणून रुजू आहेत, अक्षय यांनी २०१६ साली मुधोजी महाविद्यालयातून ग्रॅज्युएशन पूर्ण केले व नंतर पुण्याच्या आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले, त्यानंतर ते मुधोजी महाविद्यालयात तासिका तत्वावर काम करत असताना, त्यांनी  सप्टेंबर २०२१ साली पुणे विद्यापीठातून सेट ची परीक्षा दिली. दि. २८ जानेवारी २०२२ रोजी सेट परीक्षेचा निकाल लागला त्यामध्ये ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. 

    दोघांच्या यशाचे औचित्य साधून माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांनी दोघांचा भारतीय संविधान, पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सत्काराप्रसंगी माजी नगरसेवक सचिन अहिवळे, अनिकेत अहिवळे, विशाल पाटील, संदेश काकडे, दत्ता भोसले यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मंगळवार पेठ येथील अभ्यास वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते. 

No comments