Breaking News

मोटार वाहन निरीक्षक यांचा फेब्रुवारी 2022 मधील तालुकानिहाय दौरा

Taluka wise visit of Motor Vehicle Inspector in February 2022

    सातारा  :   खाजगी नवीन वाहन नोंदणी व तत्सम कामकाज तसेच पक्की अनुज्ञप्ती व तत्सम कामकाज करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक यांचा सातारा जिल्ह्यातील तालुक्यांचे ठिकाणी माहे फेब्रुवारी 2022 साठी खालील नमूद केलेल्या दिनांकास दौरे आयोजित करण्यात आल्याचे उप प्रादिेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी कळविले आहे.

    फलटण तालुका - दि. 3,10,17,24 फेब्रुवारी 2022, वाई तालुका - 2 व 16 फेब्रुवारी 2022, वडूज - 4 व 18 फेब्रुवारी 2022, दहिवडी तालुका - 11 व 25 फेब्रुवारी 2022, महाबळेश्वर तालुका - 7 फेब्रुवारी 2022, खंडाळा तालुका - 9 व 23 फेब्रुवारी 2022, लोणंद - 21 फेब्रुवारी 2022, कोरेगा तालुका - 14 फेब्रुवारी 2022.

    तसेच कोविड-19 च्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशान्वये सदर दौऱ्याच्या कामकाजामध्ये बदल करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

No comments