मारहाण व विनयभंग प्रकरणी सोमवार पेठ, फलटण येथील ७ जणांच्या विरोधात गुन्हा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ फेब्रुवारी - पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून, सोमवार पेठ फलटण येथील पवार कुटुंबातील व्यक्तींना लाकडी काठी व हाताने मारहाण करत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सोमवार पेठ फलटण येथील ७ जणांच्या विरोधात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान झालेल्या भांडणात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११:३० ते १२:०० वाजण्याच्या दरम्यान सोमवार पेठ फलटण येथे पवार कुटुंबाची मुलगी सौ. शितल विश्वास जाधव यांच्या घरा समोर अंगणामध्ये, नातु सोहम याला शाळेमध्ये जाणेस सांगत असताना, जुन्या भांडणाचा राग मनात धरून शेजारी सोमवार पेठ फलटण येथे राहणारे गंगा जाधव, सिता जाधव, गिता जाधव, सुमन जाधव, प्रमोद जाधव, तुषार जाधव, व निलेश जाधव यांनी मुलगी शितल जाधव, करण माने व नशीबा जाधव यांना हाताने मारहाण करून, केस ओढून खाली पाडून त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण केलेली आहे. तसेच तुषार, प्रमोद, निलेश यांनी विनयभंग करण्याचे हेतुने महिलेचा ब्लाऊज ओढून फाडला असल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वीरकर करत आहेत.
No comments