तलवारीने जीवे मारण्याचा प्रयत्न; २ जखमी; सोमवार पेठ फलटण येथील १४ जणांच्या विरोधात गुन्हा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ फेब्रुवारी - नाना पाटील चौकातील सोना बार समोर रस्त्यावर, पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून, राहुल नरेश पवार व गणेश जाधव यांना, तलवार, लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोमवार पेठ फलटण येथील बारा जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. झालेल्या मारहाणीत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान झालेल्या भांडणात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री ९:१५ वाजण्याच्या सुमारास फलटण येथील नाना पाटील चौकातील सोना बार समोर रस्त्यावर, राहुल नरेश पवार व त्याचा मामा गणेश जाधव हे प्रवाशांना ट्रॅव्हल्समध्ये बसवुन देत असताना, पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून इसम नामे १) देवीदास किसन पवार रा. सोमवारपेठ फलटण याने तलवारीने २) अनिल रमेश पवार याने हातात लोखंडी रॉडने ३) अविनाश सोमा जाधव याने लाकडी दांडक्याने ४) अभिषेक देवीदास पवार याने कोयत्याने, राहुल नरेश पवार याच्या डोक्यावर जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली, तसेच त्याचा मामा गणेश जाधव हा सोडविणेस आला असता, त्याच्या देखील डोक्यात त्याच हत्याराने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. तसेच ५) देवीदास ज्ञानु पवार, ६) विक्रम शंकर पवार ७) राहुल राजु पवार ८) अविनाश शंकर पवार ९) रोहित ज्ञानु जाधव १०) शंकर ज्ञानु पवार ११) कृष्णा देवीदास पवार १२) साहिल अविनाश जाधव १३) अरुण नरसिंग पवार १४) उमेश नरसिंग पवार सर्व रा. सोमवारपेठ फलटण या सर्वांनी राहुल नरेश पवार व गणेश जाधव या दोघांना हाताने लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करुन सर्व अंगावर मुका मार दिला असल्याची फिर्याद राहुल नरेश पवार यांनी दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. राऊळ हे करीत आहेत.
No comments