कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न; ३ जखमी ; सोमवार पेठ फलटण येथील ५ जणांच्या विरोधात गुन्हा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ फेब्रुवारी - नाना पाटील चौकातील सोना बार समोर रस्त्यावर, ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी बसविणेचे कारणावरुन, सुभाष यल्लाप्पा पवार, त्यांचा मुलगा, पत्नी यांना, कोयता, लाकडी दंडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोमवार पेठ फलटण येथील सात जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. झालेल्या मारहाणीत तिघेजण जखमी झाले आहेत. दरम्यान झालेल्या भांडणात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास फलटण येथील नाना पाटील चौकातील सोना बार समोर रस्त्यावर, सुभाष यल्लाप्पा पवार व त्याचा मालक सुभाष आणि मुलगा दिनेश सुभाष पवार यांना, ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी बसविणेचे कारणावरून, सुभाष यल्लाप्पा पवार व गणेश शंकर जाधव, राहुल नरेश पवार यांचेमध्ये किरकोळ वाद झाला, त्याचा राग मनात धरून गणेश जाधव व राहुल पवार यांनी सुभाष यल्लाप्पा पवार यांना ढकलुन देवुन, लाथाबुक्यांनी मारहाण केली व आणखी मुलांना बोलावुन घेतले. त्यावेळी अविनाश जाधव याच्या हातात कोयता होता. तुषार जाधव, अनिल जाधव यांच्या हातात लाकडी दांडके होते. ते सर्वजन त्याठिकाणी आल्यावर, त्यांनी सुभाष यल्लाप्पा पवार यांना व त्यांच्या मुलास शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. सुभाष यल्लाप्पा पवार यांची पत्नी सौ. सुमन ही भांडणे सोडवण्याकरीता पुढे गेली असता, अविनाश जाधव याने तिच्या डोक्यात जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयता मारला व गणेश शंकर जाधव याने तिच्या डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले असल्याची फिर्याद सुभाष यल्लाप्पा पवार यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत.
No comments