गॅलेक्सी को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. फलटण ला बँको ब्लू रिबन पुरस्कार जाहीर
फलटण : के बी उद्योगसमूह संचलित व सचिन यादव यांच्या नेतृत्वाखाली गॅलेक्सी को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. फलटण ची घोडदौड चालू आहे, अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या गॅलेक्सी संस्थेच्या कार्याचे, राज्याच्या सहकार क्षेत्रामधून कौतुक होताना दिसून येत आहे. सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणाऱ्या गॅलेक्सी संस्थेने स्थापनेपासून ३ वर्षात जास्तीतजास्त सुरक्षित ठेवी व जास्तीत जास्त सुरक्षित कर्जवाटप या निकषावर सचिन यादव यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे, या कामाची दखल घेत गॅलेक्सी को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. फलटण ला यावर्षीचा मानाचा बँको ब्लू रिबन पुरस्कार जाहीर झाला आहे.
सहकार क्षेत्रातील संस्थांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने हा पुरस्कार दिला जातो, संस्थेस हा पुरस्कार दिनांक १५ मार्च २०२२ रोजी प्रदान केला जाणार आहे.
३ वर्षा मध्ये ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित करणे, बँक मधील ग्राहकांच्या सोने ऐवजांचा विमा करणे, सर्व सभासदांचा सुमारें प्रत्येकी १ लाख रुपयांचा विमा करणे, व जास्तीतजास्त मॉरगेज व सोनेतारण कर्जवाटप करून ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित करणे, ग्राहकांना घरपोच सेवा देणे, जेष्ठ नागरिक बरोबरच विधवा, सैनिक यांनाही ठेवींवर अधिक व्याजदर, तसेच अगदी अल्पावधीत ग्राहकांना फ्री ऑनलाईन सेवा देणे, फ्री मोबाईल अँप सेवा प्रदान करणे, अश्या सर्व मोठ्या बँकिंग च्या सेवा पतसंस्था च्या ग्राहकांना त्या ही मोफत दिल्याची देखील हा पुरस्कार देताना नोंद घेण्यात आली.
संस्थेने अल्पावधीतच 10 हजार च्या वरती ग्राहक संख्या केली असून, संस्थेच्या फलटण तालुक्यात 3 शाखा विस्तार झाला आहे. तसेच संस्थेने अद्यावत व वेगळे हेड ऑफिस देखील तयार करून घेतले आहे.
मानाचा ब्लु रिबन पुरस्कार जाहीर झाल्यावर देखील सचिन यादव यांनी या पुरस्कारामुळे केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करून, यामुळे आणखी जबाबदारी वाढल्याचे नमूद केले, तसेच भविष्यात आणखी नवीन योजना आणून संस्थेचा नावलौकिक राज्यात वाढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
No comments