लाकडी दांडके व दगडाने मारहाण ; सोमवार पेठ फलटण येथील ७ जणांच्या विरोधात गुन्हा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ फेब्रुवारी - रात्री झालेल्या भांडणाचा मनात राग धरून, सोमवार पेठ येशील प्रमोद अनिल जाधव यांना व कुटुंबातील व्यक्तींना लाकडी दांडके व दगडाने मारहाण केल्या प्रकरणी सोमवार पेठ येथील ७ जणांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान झालेल्या भांडणात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १२:०० वाजण्याच्या सुमारास प्रमोद अनिल जाधव यांच्या रहाते घरासमोर महादेव मंदिराशेजारी सोमवार पेठ फलटण येथे काल रात्री झालेल्या भांडणाचा राग मनात धरून, अभिषेख देवीदास पवार, कृष्णा देवीदास पवार हे लाकडी दांडके घेवुन आले, व शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच लक्ष्मी देवीदास पवार, शितल विश्वास जाधव यांनी प्रमोद अनिल जाधव यांची आई हिस धक्काबुक्की करून शिवीगाळ केली, तसेच विक्रम शंकर पवार, देवीदास ज्ञानु पवार, करण माने हे हातात दगड घेवुन येवुन शिवीगाळ करून धक्काबुक्की केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद प्रमोद अनिल जाधव यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सोनवलकर करीत आहेत.
No comments