शिखर शिंगणापूर येथे पर्यटन निवास उभारण्याचे सभापती श्रीमंत रामराजे यांचे निर्देश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - : शिखर शिंगणापूर, ता. माण येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मालकीच्या जागेवर अत्याधुनिक सोयी सुविधांसह पर्यटन निवास उभारण्याचे निर्देश विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांना दिले आहेत.
सातारा जिल्ह्याच्या पूर्व टोकावर सातारा सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर शिखर शिंगणापूर येथे उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, शंभू महादेवाचे पुरातन व शिवकालीन मंदिर आहे. सदर ठिकाणी महाराष्ट्रासह शेजारच्या आंध्र, कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात भक्त व पर्यटक येत असतात. तेथे या भाविकांची निवासाची सोय नसल्याने त्यांची मोठी कुचंबना होत आहे.
शिखर शिंगणापूर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालकीची जागा आहे. याठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधांसह पर्यटन निवास उभारल्यास पर्यटकांची सोय झाल्याने मोठ्या प्रमाणावर भाविक व पर्यटक येथे येतील त्यामुळे स्थानिकांना व्यवसाय वृद्धीची संधी उपलब्ध होणार आहे.
No comments