Breaking News

किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

Celebrating the birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj at Fort Pratapgad

     सातारा दि.19 :   महिला व बाल विकास मंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत किल्ले प्रतापगड ता. महाबळेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

  किल्ले प्रतापगडावर आई भवानी मातेची आज सकाळी श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते  अभिषेक व पुजा करण्यात आली.  भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते विधिवत पूजन करुन   भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण ॲङ यशोमती  ठाकूर  यांच्या हस्ते करण्यात आले.

   यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला व बाल कल्याण सभापती सोनाली पोळ, समाज कल्याण सभापती कल्पना खाडे,  अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले,ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अर्चना वाघमळे, समाज कल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरीक उपस्थित होते.

    यावेळी मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची    मिरवणूक काढण्यात आली.  पालखीचे शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर ॲङ यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन भक्तिभावाने पूजन  करुन भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण  करण्यात आले.

No comments