Breaking News

बाणगंगा नदीवरील पुलाच्या कामासाठी वाहतुकीत बदल ; दोन महिने वाहतुकीस पुल बंद

Changes in traffic for bridge work on Banganga river

  सातारा दि.2 : बाणगंगा नदीवर फलटण शहरास लागून पुलाचे काम प्रगतीत  असून अस्तित्वातील पुलाचे भराव लागून असल्याने नवीन पुलाचे  काम करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार 10 फेब्रुवारी ते 10 एप्रिल 2022 पर्यंत दोन महिने वाहतुकीस अस्तित्वातील पुल बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग फलटणचे उप अभियंता यांनी दिली आहे.

    सातारा रस्त्याने येणारी वाहतुक वाठार निंबाळकर फाटा येथून वडजल मार्गे पुणे रस्त्याने, जिंती नाका, नाना पाटील चौक फलटण अशी येईल.        तसेच मिरगाव वरून निंभोरे मार्गे पुणे रस्त्याने, जिंती नाका, नाना पाटील चौक फलटण  अशी दुसऱ्या मार्गाने वळविण्यात येणार आहे.

No comments